Uncategorized

Bhujbal-Fadnavis Meet : …म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

Bhujbal-Fadnavis Meet

Bhujbal-Fadnavis Meet : …म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

छगन भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत, मंत्री म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम पाहिले, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे. एक ओबीसी समाजासाठी काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आहे, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले. मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश न झाल्याने स्वभाविक त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते नाराज होते. मंत्रिमंडळाचा प्रमुख म्हणून त्यांनी ही भेट घेतली असू शकते. देवेंद्र फडणवीसांचा जर एकंदर स्वभाव आपण पाहिला तर सगळ्यांशी समन्वय साधत सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती आहे. हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे. एकोप्यानं सगळ्यांना पुढे नेण्याचा त्यांचा स्वभाव असल्याचेही प्रवीण दरेकर म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, छगन भुजबळ यांच्यासारखा नेता नाराज असणं हे त्या ठिकाणी योग्य वाटत नाही. देवेंद्र फडणीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ही भेट झाली असावी असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button