महाराष्ट्र
: मनात समुद्राची दहशत निर्माण करणाऱ्या त्या खतरनाक बोट अपघाताचा VIDEO
Mumbai Boat Capsized

- Mumbai Boat Capsized : मुंबईच्या समुद्रात भीषण अपघात झाला. त्या बोट अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. नेमका हा अपघात कसा घडला, ते या व्हिडिओमधून तुम्ही पाहू शकता. असं काही घडेल याची कोणी कल्पनाही केली
नौदलाने सांगितलं की, मुंबई बंदरात स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरु होती. त्यावेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने स्पीड बोटीच नियंत्रण सुटलं व स्पीड बोट नीलकमल बोटीला येऊन धडकली. या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. त्यात स्पीड बोट नील कमल बोटीपासून काही अंतरावर समुद्रात राऊंड मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना सुरुवातीला अजिबात असं वाटणार नाही की, असा काही भीषण अपघात होईल. पण स्पीड बोट टर्न झाल्यानंतर नीलकमल बोटीच्या दिशेने येताना पूर्णपणे अनियंत्रित झाली व नीलकमल बोटीला धडकली